
करमाळा प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील हिंदी विभागात बी ए तीन मध्ये अध्यापन करीत असलेल्या कृष्णा शेलार, सलमान शेख, योगेश हांडे, चैतन्य भोगे व सुधीर काळे यांची दि. 22 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 अखेर छत्तिसगढ़ येथे अहिंदी भाषा छात्र अध्ययन यात्रेसाठी निवड झाली आहे. सदर यात्रेचा सर्व खर्च मानव संसाधन मंत्रालय अंतर्गत केन्द्रीय हिंदी निदेशालय

दिल्ली (भारत सरकार) करते. हिंदी विभाग प्रमुख व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे यांचे प्रयत्नातून दर वर्षी हिंदीच्या विद्यार्थांच्या निवड़ी साठी प्रयत्न होतात. सदर विद्यार्थ्यांच्या निवडीने विद्यार्थ्यांमध्ये हिंदी विषया बद्दल आवड निर्माण होत आहे. निवड झालेल्या विद्यार्थांचे संस्थेचे सचिव विलासराव घुमरे, अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, प्र. प्राचार्य ए.पी. माने, प्रा. खरटमल व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व अध्ययन यात्रेस शुभेच्छा दिल्या.
