
करमाळा प्रतिनिधी
पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत हे करमाळा दौऱ्यावर आले असता त्यांनी कमलाईनगरी कार्यालयास भेट दिली.
यावेळी कमलाई नगरीचे संपादक पत्रकार तथा स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला.
यावेळी सर्व स्वयंअर्थसहाय्य शाळेंच्या समस्यांबाबत व आर टी ई बाबत मा. आ. सावंत यांच्याशी विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच दळवी यांनी सांगितले की, जसे इतर शाळेंना तुम्ही सहकार्य करता त्याच प्रमाणे स्वयंअर्थ शाळेंना ही सहकार्य करा व वरीष्ठ पातळीवर त्यांच्या समस्यांचे निवारण करा. यावर सावंत यांनी नक्कीच इतर शाळेप्रमाणे तुम्हालाही योजना मिळाव्यात याबाबत प्रयत्न करणार आहे असे सांगितले. यावेळी जगदाळे सर, गाडेकर सर उपस्थित होते.
