करमाळा प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या नॅशनल अबॅकस कॉम्पिटिशन या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये ईशानी अमोल गायकवाड, इयत्ता पहिली जि.प. प्राथमिक शाळा, वीट हिने सीनियर लेवल मध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला. ईशानी गायकवाड हिने केवळ 4 मिनिट 52 सेकंदात 100 पैकी 100 अचूक गणित सोडवून महाराष्ट्र राज्यात अव्वल क्रमांक पटकावलेला आहे. ईशानीचे वडील प्रतापसिंह मोहिते पाटिल महाविद्यालय करमाळा येथे ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. सदर परीक्षेसाठी तिला शिक्षिका मंजुश्री मुसळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *