करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील झरे येथील जयप्रकाश बिले पब्लिक स्कूलच्या वतीने संविधान दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका अमृता परदेशी मॅडम, सर्व शिक्षक स्टाफ व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व प्रथम भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे सहकारी शिक्षक सतिश कोंडलकर सर व तानाजी हरणावळ सर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संविधान दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या सहशिक्षका नफिसा घोडके मॅडम व अनिता कोदगे यांनी संविधान दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना संस्थेच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

