करमाळा प्रतिनिधी
स्वीप अंतर्गत करमाळा नगरपरिषद मार्फत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता करमाळा शहरामध्ये विविध ठिकाणी लोकशाही बळकट करण्यासाठी जनतेला जागृत करण्याचा उपक्रम म्हणून पथनाट्य आयोजित करण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा नगरपरिषद व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पथनाट्य मार्फत जनजागृती करण्यात आली. नागरिकास मतदान करिता प्रेरित करणे कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला, अमिषाला बळी न पडता मतदान करावे व लोकशाही राष्ट्र बळकट करावे यावर पथनाट्यमार्फत विशेष भर देण्यात आला तसेच नागरिकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळाला मतदानाचे महत्व तसेच शहराचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अमिषास बळी न पडता मतदान करून योग्य रित्या निवडणूक कार्यक्रमास साथ देऊ व मतदान टक्का वाढवू असा अभिप्राय दिला.

