करमाळा प्रतिनिधी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने करमाळा व कुर्डूवाडी नगरपरिषदेसाठी करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने निवडणूक प्रभारी पदी नियुक्तीचे आदेश दिले. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून राज्यभरातील निवडणूक प्रभारींच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातून शिवसेनेच्या वतीने माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व उत्तम प्रकाश खंदारे यांचा निवडणूक प्रभारी मध्ये समावेश आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *