करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील निमगाव ह येथील ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यातील नीळ पाटील परिवारातील मार्गदर्शक हभप बाळासाहेब नीळ पाटील यांचा अमृत महोत्सव (अभिष्टचिंतन सोहळा) आयोजित करण्यात आला आहे. यानिमित मौजे निमगाव हवेली ता.करमाळा येथे सुप्रसिद्ध कीर्तनकार व समाजप्रबोधनकर हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे हरी कीर्तनाचा कार्यक्रम दि.१४/११/२०२५ रोजी सायं. ५ वाजता संपन्न होणार आहे. तसेच सायं. ८ ते ११ वाजता सुप्रसिद्ध भजन सम्राट बाळासाहेब वाईकर गुरुजी, संगीत अलंकार शिवानंद स्वामी पुणे, ह.भ.प. सतीश महाराज सूर्यवंशी व तबला साथ ताल सम्राट शेखर दरवडे अहिल्या नगर यांचा सुगम संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी निमगाव हवेली व पंचक्रोशीतील सर्वच नागरिकांनी तसेच किर्तन व भजन प्रेमी भाविकांनी या आनंदमयी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन अविनाश बाळासाहेब पाटील व डॉ. पद्मिनी अविनाश पाटील यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *