करमाळा प्रतिनिधी

ओपनच्या जागेवर ओपनवाले उभा करावे, ओबीसींच्या ठिकाणी ओबीसींनाचा उभा करावे अशी मागणी समता परिषदेचे प्रांतीक सदस्य दिलीप भुजबळ यांनी केली आहे.

पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक नंतर आहे आता नगर परिषद निवडणूक आहे. होणाऱ्या सर्व निवडणूकीत मुळ ओबीसींच्या जागी मुळ ओबीसीच उमेदवार द्यावा, ओपनच्या जागेवर मुळ ओपनच द्यावा. ओपन हा ओबीसी, एससी व इतर समाज बांधवांचा मोठा भाऊ आहे. मोठया भावाने धाकट्या भावाला संभाळावे तर मुळ ओबीसीनेही ओपनच्या जागेवर उमेदवार देऊ नये. मोठ्या भावालाच सहकार्य करावे. कालच देशाचे नेते शरदचंद्र पवार यांनी सांगितले आहे तर समता परिषदेचे अध्यक्ष छगनराव भुजबळ यांचे आम्हाला मार्गदर्शन लाभत आहे. जर ओबीसी वर अन्याय झाला तर मतदान रूपी ओबीसी बांधव योग्य तो निर्णय घेईल अशी माहिती समता परिषदेचे प्रांतीक सदस्य दिलीप भुजबळ यांनी दिली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *