करमाळा प्रतिनिधी

महात्मा गांधी विद्यालयातील १९७७ साली दहावी झालेल्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचा स्नेहमेळावा उत्साहात, आनंदात आणि भावपूर्ण वातावरणात  संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन, राष्ट्रगीत व प्रार्थना गाऊन करण्यात आली. दिवंगत शिक्षक व विद्यार्थी यांना श्रध्दांजली वाहिल्यानंतर उपस्थित असलेले माजी प्राचार्य आर.आर.मोरे, एस.जी.सोनी मॅडम, निवृत शिक्षक एस.डी.विधाते, एसपी.शिंदे, जांभळे, मोठे सर, निवृत परिचर रणजितसिंह जव्हेरी, विद्यमान प्राचार्य पाटील यांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आदरपूर्वक सत्कार, सन्मान करण्यात आला.

त्यानंतर या माजी विद्यार्थ्यांची शहरातून सवाद्य रॅली काढण्यात आली. हॉटेल राजयोगच्या सभागृहात झालेल्या स्नेहभोजन प्रसंगी अनेक माजी विद्यार्थ्यांनी त्यावेळची शाळा व परिसर, शिस्तप्रिय शिक्षकांविषयी असलेला आदरयुक्त दरारा, शिक्षकांचे विद्यार्थ्यांविषयी असणारे समर्पण, शाळेचा रमणीय परिसर, शाळेत नियमित होणारे शैक्षणिक उपक्रम, व्याख्याने, स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम आदी जुन्या आठवणींना उजाळा देत पुन्हा एकमेकांना भेटण्याचे ठरवून भाऊक वातावरणात एकमेकांचा निरोप घेतला. या स्नेहमेळाव्याला साठ माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे नियोजन बॅचमेट संजय मोरे, संजय दिवाण, शिवशंकर वांगडे, अशोक खुळे, अनिल सोनटक्के, जयंत कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नितीन चोपडे, सोपान इवरे यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *