करमाळा प्रतिनिधी

केळी निर्यात व्यवसायातून फसवणूक प्रकरणी कंदर येथील केळी निर्यातदार दिग्विजय मोरे यांचा जामीन फेटाळला आहे. याप्रकरणी हकीकत अशी की, करमाळा येथील माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप यांचे पुत्र व मा. नगरसेवक राहुल नामदेवराव जगताप यांनी आरोपी दिग्विजय सुभाष मोरे राहणार कंदर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर तसेच त्याचा मित्र आरोपी नूरआली हगीघाट यांचे विरुद्ध करमाळा पोलीस स्टेशन येथे फसवणूक केल्या बाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील फिर्यादी राहुल नामदेवराव जगताप यांचे आर जे ऍग्रो कंपनी मार्फत त्यांनी आरोपी दिग्विजय सुभाष मोरे यांचे मध्यस्थीने दुसरा आरोपी नूरआली हगीघाट याचे तलेश एंटरप्राइजेस या कंपनीला निर्यातक्षम केळीचा पुरवठा केला होता परंतु वरील दोघांनी संगनमताने निर्यातक्षम केळीची विक्री करून फिर्यादी राहुल नामदेवराव जगताप यांची फसवणूक केल्या

बाबतचा गुन्हा दाखल झालेला होता तर नंतर यातील आरोपी दिग्विजय सुभाष मोरे यांनी बार्शी येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळणे कामी जामीन अर्ज दाखल केला होता. जामिन अर्जाची सुनावणी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश रेड्डी मॅडम यांच्यासमोर झाले. प्रकरणी मूळ फिर्यादीच्या वतीने एडवोकेट निखिल पाटील यांनी यातील आरोपी दिग्विजय मोरे यांनी यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारे फिर्यादीची फसवणूक केलेली असून त्याबाबत सुद्धा दिनांक 20.1.2025 रोजी त्याचे विरुद्ध व त्याचा मित्र सोहेल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच याच आरोपीविरुद्ध नलिनी रघु पुजारी राहणार वर्तक नगर ठाणे यांनी सुद्धा वर्तक नगर पोलीस स्टेशन येथे फसवणूक केले बाबत तक्रारी अर्ज दिलेला असून त्याची चौकशी चालू आहे. तसेच इमरान नसीर अहमद राहणार तुर्भे नवी मुंबई यांनी सुद्धा एपीएमसी पोलीस स्टेशन नवी मुंबई येथे तक्रारी अर्ज दाखल केलेला असून त्यांची सुद्धा अशाच प्रकारे फसवणूक केले बाबतचा अर्ज दाखल केलेला असून त्याचीही चौकशी चालू आहे. यातील आरोपीने विविध लोकांना बोगस चेक दिलेला असून ते सुद्धा वटलेले नाहीत यावरून सदरील आरोपी हा सराईत गुन्हेगार असून केळी व्यापाऱ्यांची राजरोसपणे फसवणूक चालू असल्याबाबतचा युक्तिवाद केला तसेच अप्रत्यक्षरीत्या यामध्ये शेतकऱ्यांची सुद्धा फसवणूक होत असल्याबाबतचा युक्तिवाद करण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी दिग्विजय मोरे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. प्रकरणी मूळ फिर्यादीतर्फे एडवोकेट निखिल पाटील तर सरकार पक्षातर्फे एडवोकेट होटकर यांनी काम पाहिले. सध्या आश्या सराईत गुन्हेगारांना कसलीच कायद्या ची भीती राहिली नाही हे स्पष्ट दिसून येत आहे. जर समाजात प्रतिष्ठीत व्यक्ती सोबत अशा घटना घडत असतील तर सामान्यांचे काय अशी सर्वत्र चर्चा आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *