करमाळा प्रतिनिधी

क्रिडा युवक संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय “विभागस्तरीय धनुर्विद्या” स्पर्धा दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी पुणे येथे पार पडल्या. त्यात न्यू इरा पब्लिक स्कूलची  विद्यार्थीनी श्रद्धा उमेश बोराडे हिची 14 वर्षे वयोगट मधुन धनुर्विद्या मध्ये विभागस्तरीय स्पर्धेत उज्ज्वल यश प्राप्त करत तिची  “धनुर्विद्या स्पर्धेसाठी” राज्यस्तरावर निवड झाली.

विजयी खेळाडू व क्रीडा शिक्षक सागर ताकतोडे यांचे संस्थेचे संस्थापक डॉ. ब्रिजेश बारकुंड, विद्या बारकुंड, कसबे सर, हराळे सर, शिंदे सर व सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *