
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढवणार असून महायुतीच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका संदर्भात आढावा बैठक इच्छुकांच्या मुलाखती करमाळा येथे संपन्न झाल्या. यावेळी अजित दादा पवार सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालय येथे करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा तालुका अध्यक्ष भरत भाऊ आवताडे, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अजिंक्य पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, युवक तालुकाध्यक्ष किरण फुंदे, माजी तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील, कार्याध्यक्ष सुजित तात्या बागल, तालुका प्रवक्ते अॅड. अजित विघ्ने, डॉ. गोरख गुळवे, प्रदेश सदस्य बाळकृष्ण सोनवणे, तालुका उपाध्यक्ष अमोल फरतडे, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारणी सदस्य चंद्रकांत काका सरडे, जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार, उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष प्रसाद जगताप, लेबर फेडरेशन संचालक मानसिंग खंडागळे, तरटगाव माजी सरपंच अभिजीत पाटील उपस्थित होते.
