करमाळा प्रतिनिधी

शिवसेनेचे माजी आमदार जयवंतराव जगताप, नगराध्यक्ष वैभव राजे जगताप, मार्केट कमिटीचे संचालक शंभूराजे जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग चार मध्ये मी विविध विकास कामे करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी 24 तास सक्रिय असतो. यामुळे या प्रभागातून माझा विजय निश्चित असून केवळ जयवंतराव जगताप यांचा आशीर्वाद मला विक्रमी मताने निवडून आणेल असा विश्वास प्रभाग चार मधील शिवसेनेचे इच्छुक उमेदवार युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख चंद्रकांत राखुंडे यांनी व्यक्त केला.चंद्रकांत राखुंडे यांनी या मतदारसंघातून नगरपालिकेची गेल्या वेळेस निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती त्यावेळेस त्यांना 330 मते मिळाली होती तर विजयी उमेदवाराला 540 मते मिळाली होती. 210 मतांनी चंद्रकांत राखुंडे यांचा पराभव

झाला होता.मात्र गेली सात वर्षापासून चंद्रकांत राखुंडे यांनी या प्रभागात अनेक कामे केली असून सर्वसामान्यांचे अडीअडचणी सोडवण्यासाठी वेळ दिला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली असून अनेक रुग्णांवर मोफत ऑपरेशन केले आहेत. जवळपास या प्रभागातील 70 महिलांना बांधकाम कामगाराचा लाभ मिळवून दिला आहे.या प्रभागातील नागरिकांचे पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, आदी शासकीय कार्यालयातील प्रश्न सोडवण्यासाठी सदैव मदत केली आहे.सध्या चंद्रकांत राखुंडे हे प्रभाग चार मधील प्रबळ दावेदार म्हणून करमाळा शहरात चर्चेत नाव असून त्यांच्या उमेदवारीला या प्रभागातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांनी पाठिंबा दिला आहे……… या प्रभागातील जवळपास 100 नागरिकांना घेऊन शिवसेनेचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी करणार असल्याचे माहिती चंद्रकांत राखुंडे यांनी दिली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *