
करमाळा प्रतिनिधी
रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने करमाळा तालुका रिपब्लिकन सेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तसेच येणाऱ्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली. सदर कार्यक्रम करमाळा जिल्हा परिषद विश्रामगृह येथे संपन्न झाला.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष देवा भाऊ लोंढे व रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण आहोळ यांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले व निवडी जाहीर करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

करमाळा तालुका अध्यक्ष युवराज पांडुरंग भोसले, तालुका उपाध्यक्ष मच्छिंद्र गायकवाड आळजापूर, तालुका उपाध्यक्षराहुल गायकवाड आवाटी, तालुका सहसचिव विष्णू आखाडे आळजापूर, तालुका मीडिया प्रमुख संजय तेली, शहराध्यक्ष कालिदास पवार, शहर उपाध्यक्ष अश्विन कुमार कांबळे, शहर सचिव विशाल सूर्या भाई शिंदे याप्रमाणे पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष देवा भाऊ लोंढे म्हणाले की, रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी करमाळा तालुक्यात गाव तिथे शाखा बांधण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. तसेच गोरगरीब, दलित, वंचित, आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा मुकाबला करण्यासाठी व बहुजनांना सत्ते पर्यंत पोहोचण्याचे काम रिपब्लिकन सेना करणार असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमास करमाळा शहर व तालुक्यातील बहुजन बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला.