
करमाळा प्रतिनिधी
मोरवड गावचे राजेंद्र मोहोळकर हे मकाई सहकारी साखर कारखान्याचे स्विकृत संचालक आहेत. त्यांच्या पत्नी रेणुका राजेंद्र मोहोळकर या बागल गटाच्या कट्टर कार्यकर्ते असून जर बागल गटांच्या आदेशनुसार पंचायत समिती वीट गणातून उमेदवारी दिली तर शंभर टक्के निवडणूक जिंकू असे सांगितले. रेणुका राजेंद्र मोहोळकर यांनी विधानसभेवेळी दिग्विजयभैया बागल यांचा रश्मीदिदी बागल- कोलते यांच्या समवेत धडाडीने प्रचार करून जास्त मतं मिळवण्या प्रयत्न केला. जर रश्मीदिदी यांनी आदेश दिला तर वीट पंचायत समिती गणातून निवडणूक लढू आणि जिंकू असे सांगितले. मामांच्या काळापासून बागल गटाशी एकनिष्ठ असलेले हा मोहोळकर परिवार असून आजही त्याच निष्ठने ते एकत्र काम करत आहे.
