
करमाळा प्रतिनिधी
विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथील भूगोल व अर्थशास्त्र विभाग यांनी झरे येथील धनस्मृती सूतगिरणीस भेट दिली.
यावेळी इन्चार्ज शंकर सर यांनी तेथील माहिती सांगितली. सुपरवायझर किशोर पाटील यांनी प्रत्यक्ष मशीन द्वारे कापसापासून दोरा कसा तयार होतो हे दाखवले व अनमोल असे मार्गदर्शन केले. यावेळी जनरल मॅनेजर बाळासाहेब कोरडकर, सागर गुटाळ, धनाजी बदे यांनीही सूतगिरणी बद्दल माहिती दिली.
भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. विजया गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. कृष्णा कांबळे सर, आय.क्यू.ए.सी. प्रमुख प्रा.डॉ.अंकुश करपे यांनी भेटीचे आयोजन केले होते. यावेळी प्रा. ज्ञानेश्वर सुपेकर व विद्यार्थी उपस्थित होते.
