करमाळा प्रतिनिधी

मुंबई सांताक्रुज पूर्व रुक्मिणी विठ्ठल संस्था मार्फत सोलापूर करमाळा येथील पुरग्रस्थांना मदत केली आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना, धान्याचे किट, भांडे, कपडे, शालेय साहित्य असे गृह उपयोगी साहित्य संस्थे मार्फत देण्यात आले आहे.

प्रमुख मार्गदर्शक नियोजक महेश नेमान, सहकारी रवींद्र जाधव यांच्या सहकार्याने साहित्य देण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाचे संतोष वारे, श्री रामचंद्र बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी, अशोक इन्स्टिट्यूटचे विशाल शिंदे, अशोक शिंदे, अशोक मुरूमकर,भोसे येथील सुरवसे आदी मान्यवर शेतकरी, शाळकरी विद्यार्थी पुरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *