करमाळा प्रतिनिधी

जेऊर येथे झालेल्या जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयातील 6 खेळाडूंची विभागीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

14 वर्ष वयोगटामध्ये वैष्णवी युवराज जाधव व सुयोग हरी क्षिरसागर, 17 वर्ष वयोगटात आदित्य ललित शिंदे, श्रेया अशोक सरडे, प्रतिराज दादासाहेब शिंदे दिव्या योगेश भुसारे हे निवड झालेले खेळाडू आहेत.

वरील सर्व खेळाडूंची विभागासाठी निवड झाल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यशस्वी विद्यार्थ्यांना योग्य असे बक्षीस देऊन विद्यालयाची चालक संस्था व समाजसेवा मित्र मंडळाचे पदाधिकारी यांनी यथोचित सन्मान करण्याचे ठरविले असल्याची माहिती संस्था सचिव गुलाबराव बागल यांनी जाहीर केले आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *