
करमाळा प्रतिनिधी
शेटफळ परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने गावा जवळून जाणाऱ्या ओढ्याला मोठे पाणी आले होते. यामध्ये गावातील काही कुटुंबीयांच्या घरांमध्ये पाणी जाऊन त्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. काही कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले होते. अशा कुटुंबीयांना तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते मदत किटचे वाटप करण्यात आले, यावेळी सरपंच काकासाहेब गुंड, विलास लबडे, वैभव पोळ, नानासाहेब साळुंखे, कैलास लबडे, प्रशांत नाईकनवरे, सुभाष पोळ, गजेंद्र पोळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी तहसीलदार ठोकडे यांनी नुकसानग्रस्त कुटुंबीयांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून नुकसान झालेले कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतलेली आहे. यावेळी गावात इतर ठिकाणी झालेल्या नुकसानीची ही त्यांनी पाहणी केली अतिवृष्टीच्या काळामध्ये तहसीलदार ठोकडे यांनी तत्परता दाखवत तालुक्यात कसलीही जीवित हानी न होऊ देता तालुक्यातील उत्कृष्ट आपत्ती व्यवस्थापन केल्याबद्दल येथील जिजामाता शेतकरी महिला गटाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिजामाता महिला शेतकरी गटाचे अध्यक्ष हर्षाली नाईकनवरे मंदाकिनी साळुंके, निता पोळ, अश्विनी नाईकनवरे, लक्ष्मी पोळ, प्रतिभा पोळ, सुषमा पोळ, विद्या जाधव गंगाताई लबडे माधुरी साळुंके, जानवी पोळ यांच्यासह गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
