करमाळा प्रतिनिधी

सध्या सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सर्व शेतकऱ्यांच्या ताली, बंधारे, ओढ्यांना नदीला पूर आल्यामुळे मोल मजुरी तसेच शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली होती. करमाळा तालुक्यातील सिना नदी शेजारील विशेषता संगोबा परिसरातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी करमाळा शहर व तालुका मुस्लिम समाज तसेच हाजी हाशमुद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करमाळा संगोबा रोडवरील महामुनी मंगल कार्यालय मध्ये मोफत अन्नदान वाटपाचे कार्यक्रम करण्यात आले.

करमाळा तालुक्यातील विशेषता संगोबा परिसरातील सिना नदीच्या पुरामुळे व सततच्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे गेली पंधरा दिवस झाले या लोकांच्या सततच्या पुरामुळे शेतकरी शेतमजूर यांच्यावर अक्षरशा उपासमारीची वेळ आली होती यामुळे मुस्लिम समाज तसेच हाजी हाशमुद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महामुनी मंगल कार्यालय मध्ये मोफत अन्नदानाचे वाटप करण्यात आले.

यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी माजी नगरसेवक हाजी अल्ताफ शेठ तांबोळी बोलताना म्हणाले की, हाजी हाशमुद्दीन चॅरिटेबल ट्रस्ट ही सामाजिक संघटना गेली 14 वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे आहे या उदात्त हेतू करणाने सदरचा सामाजिक मोफत अन्नदानाचा उपक्रम आम्ही राबविला असल्याचे तांबोळी यांनी बोलताना सांगितले.

यावेळी सदरच्या सामाजिक उपक्रम कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष तसेच युवा नेते संतोष वारे सहित जय महाराष्ट्र मित्र मंडळाचे रणजीत ढाणे, राजू घाडगे, पांडुरंग वडे, पांडू जाधव, तुळशीराम दुधाट, माजी नगरसेवक नितीन घोलप, बाळासाहेब इंदुरे, आदि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

सदरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवा शहराध्यक्ष अमीर शेठ तांबोळी तसेच पैलवान सोहेल पठाण, अरबाज बेग, असिम बेग, समीर शेख, आफताब पठाण, जिशान शेख, सोहेल शेख, गंमड शेख, अमन शेख, नवाज बेग, नदीम शेख, साबीर शेख, शाहरुख शेख व मुस्ताक शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.

…………….

हाजी हाशमुद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करमाळा शहरात आजपर्यंत आम्ही विविध सामाजिक उपक्रम राबविले असून यामध्ये दीपावली सणांमध्ये गोरगरीब जनतेला दिवाळी फराळा चे साहित्य वाटप करणे, रमजान ईद मध्ये गोरगरीब मुस्लिम बांधवांना शीरखुर्मा ची साहित्य वाटप करणे, कोरोनाच्या काळात कोरोना बाधित नागरिकांना मास्क तसेच अन्नधान्य वाटप करणे याशिवाय गणेशोत्सव काळात प्रत्येक गणेश मंडळातील अध्यक्षांचा सन्मान करणे याशिवाय गोरगरीब जनतेला नियमित मदत करणे या आणि अशा अनेक सामाजिक उपक्रम आम्ही गेली 14 ते 15 वर्षापासून अविरतपणे राबवीत आलो आहे व भविष्यात देखील असेच सामाजिक उपक्रम आम्ही आमच्या ट्रस्टच्या तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने राबविणार आहोत – हाजी अलताफ शेठ तांबोळी मा. नगरसेवक करमाळा

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *