
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यामध्ये सतत आठ ते दहा दिवसांपासून ढगफुटी अतिवृष्टीचा सतत पाऊस पडत असल्यामुळे ओढे नाले नद्या तुडुंब भरून वाहिल्याने सीना नदीकाठच्या गावांना पाण्याने वेडा मारला होता त्याचबरोबर तालुक्यातील अनेक गावातील कुटुंबांच्या घरामध्ये पाणी जाऊन संसार उपयोगी भांड्याचे व अन्नधान्याचे भयंकर नुकसान झालेले आहे.

त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतातील हातातोंडाशी आलेली पिके यासह शेतजमिनी वाहून गेल्या यांना सावरण्यासाठी एक मदत म्हणून सकल मुस्लिम समाज करमाळा यांच्यावतीने करमाळ्याचे कर्तव्यदक्ष पालक तहसीलदार मॅडम शिल्पा ठोकडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मुस्लिम समाज बांधवांनी आपल्या कष्टाच्या पैशामधुन काही रक्कम आपल्या बांधवांवर आलेल्या आसमानी संकटाला प्रत्युत्तर देण्यासाठी मदतीकरिता धावून आले आहे. करमाळा तहसील कार्यालयाच्या माध्यमातून आवाटी येथील दर्गा येथे असलेल्या पूरग्रस्त बांधवांना नौवरात्र निमित्ताने असलेल्या सर्व पूरग्रस्त बांधवांना करिता दोन दिवस खिचडीचे पदार्थ वाटप करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना सकल मुस्लिम समाजाचे मार्गदर्शक हाजी कलीम काझी सर यांनी सांगितले की, आमच्या शेतकरी बांधवांला आलेल्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आमचा समाज नेहमीच कटीबद्ध राहील या बळीराजाच्या घराचे घरातील संसार उपयोगी साहित्याचे व शेतीचे, जनावरांचे व शेतातील उभ्या पिकांची प्रचंड नुकसान झालेली आहे त्याला या संकटात मदत करण्यासाठी त्याला पुन्हा एकदा भक्कम उभा राहण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव आपल्या सर्वांच्या सहकार्याने प्रयत्नाची परराष्ट्र करू असे सांगितले.
मॉं आयशा मस्जिद चे मुफ्ती अबूरेहान यांनी सांगितले की, हजरत मोहम्मद पैगंबर यांची शिकवण आहे की, मनुष्य हा कोणत्याही जाती-धर्माचा असला तरी त्याला संकटाच्या वेळी मदत करताना हात आकडता न घेता सर्वप्रथम तुम्ही त्या मनुष्याला मदत करण्याचा विचार करावा. त्याला वाटू नये की, आपण या जगात एकटे आहोत. आपल्यावर आलेल्या संकटाच्या वेळी कोणीही आपल्यासाठी नाही. अशी त्याची मनोभावना होऊ नये त्यापूर्वी त्याला तुम्ही मदत करावी तरच तुमचा खरा मानवधर्म दिसून येईल असे सांगितले.
करमाळ्याचे कर्तव्यदक्ष व पालक तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांनी सांगितले की, करमाळ्यातील सकल मुस्लिम समाज बांधवांनी संकट समई जी मदत केली आहे ती कधीही न विसरण्यासारखी आहे. ज्याचे मोल अमूल्य आहे या मदती करता ज्या मुस्लिम समाज बांधवांनी फुल ना फुलाची पाकळी म्हणून जी मदत केली आहे त्याबद्दल मी सर्व समाज बांधवांचे आभार मानत आहे. यावेळी समाजातील जमीयत उलमा हिंदचे तालुकाध्यक्ष मौलाना मोहसीन, जेष्ठ नेते फारुख जमादार, अॅड. अलिम पठाण, डॉक्टर समीर बागवान, नायब तहसीलदार सादिक काझी, कोर्टी चे सर्कल भाऊसाहेब युसूफ बागवान, अॅड. नईम काझी, जामा मशीद चे मौलाना अन्वर, सन राईस क्लास चे प्रा. इब्राहिम मुजावर सर, सकल मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जमीर सय्यद, रोहित पवार फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष मुस्तकीम पठाण, उर्दू शाळा शालेय समितीचे उपाध्यक्ष इक्बाल शेख, मार्गदर्शक समीर शेख, रमजान बेग, सुरज शेख, जावेद सय्यद, आरीफ पठाण, इम्तियाज पठाण, जहाँगीर बेग, अलिम पठाण, कलीम शेख, अरबाज बेग, शाहीद बेग, फिरोज बेग, कलंदर शेख, यासीन सय्यद, अमीर शेख, गुलाम सय्यद, कयुम मदारी, दाऊद मदारी, अक्रम मदारी उपस्थित होते.