करमाळा प्रतिनिधी

जालना येथील मल्हार योध्दा दीपक बोराडे यांना जाहीर पाठिंबा म्हणून उद्या करमाळा येथे भव्य रास्ता रोको करण्यात येणार आहे याबाबतचे निवेदन तहसील कार्यालय येथे दिले आहे.

निवेदनात असे म्हटले आहे की, जालना येथील मल्हार योध्दे दिपक भाऊ बोराडे गेली 14 दिवसापासून जालना येथे आमरण उपोषणास बसलेले आहेत. त्यांच्या आमरण उपोषणाचा उद्याचा १५ वा दिवस असून सरकारने अजूनही ST आरक्षण अंमलबजावणीची दखल घेतलेली नाही. आमची संविधानिक मागणी आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत ३६ व्या क्रमांकावर धनगर म्हणून आरक्षण दिलेले आहे. परंतु फडणवीस सरकार शब्द देऊन चालढकल करत आहे. उपोषणकर्त्यें दिपक बोराडे यांची प्रकृती खालावली आहे. त्याच अनुषंगाने सकल धनगर समाज करमाळा तालुक्याच्या वतीने उद्या दिनांक १/१०/२०२५ रोजी बुधवार रोजी, सकाळी ठिक ११:०० ते २:०० या वेळेत मौलालीचा माळ, बायपास चौक,जेऊर रोड येथे जाहीर पाठिंबा म्हणून रास्ता रोको करण्यात येणार आहे याची सर्वस्व जबाबदारी सरकारची असेल. सरकारने तात्काळ ST आरक्षणांची अमंलबजावणी करावी ही नम्र विनंती!..

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *