करमाळा प्रतिनिधी

करमाळा–आळजापुर–जामखेड या राज्य मार्गावरील सीना नदीवरील पुलाचा भरावा दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी आलेल्या पुरामुळे वाहून गेला. या अनपेक्षित घटनेमुळे सदर राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

या परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित कार्यवाही सुरू केली. जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी पुरामुळे खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती व पूर्वस्थिती करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम मंडळ, सोलापूरचे अधीक्षक अभियंता कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

त्याअनुषंगाने कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अकलूज सौ. सुनीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभाग, करमाळा कार्यालयातील उपविभागीय अभियंता श्री. अभिषेक पवार व सहाय्यक अभियंता श्री. आदित्य खटाटे यांनी रात्री उशिरापर्यंत (सुमारे १ वाजेपर्यंत) काम करून दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी भरावाचे काम पूर्ण केले. त्यामुळे सदर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे.

या कामी जवळा व राजापूर ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच उपविभाग, करमाळा येथील अभियंता श्री. बाबर, श्री. लोकरे, लिपिक श्री. सापते व वाहन चालक श्री. ढगे यांनीही मोलाचे सहकार्य केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *