करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा “गोमय दिवाळी संकल्प” या उपक्रमांतर्गत, यंदाच्या दिवाळी सणानिमित्त गोमय दिवे, गोमय लक्ष्मी मूर्ती, गोमय साबण, उटणे आणि इतर नैसर्गिक व पर्यावरणपूरक उत्पादने यांचा प्रचार-प्रसार वेबसाइट, सोशल मीडिया तसेच विविध माध्यमांद्वारे करण्यात येत आहे.
राज्यातील प्रत्येक घरात पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी साजरी व्हावी या हेतूने, महाराष्ट्र गोसेवा आयोगातर्फे गोमय दिवे आणि गोमय लक्ष्मी मूर्ती स्थापनेचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळेलअशी आशाआहे. राज्यभरातील उत्पादक, संस्था, गोशाळा आणि उत्पादने तयार करणारे कारखाने यांनी त्यांच्या उत्पादनांची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. सदर माहिती दिनांक 03/10/2025 पर्यंत नोंदवायची आहे .संकलित माहिती संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल जेणेकरून आपण तयार केलेली उत्पादन जनमानसात पोहोचण्यास मदत होईल यातून राज्यातील गोशाळा आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण बनाव्यात आणि गोमय मूल्यवर्धनाच्या माध्यमातून त्यांचा नागरिकांशी थेट संपर्क प्रस्थापित व्हावा, हा या उपक्रमामागचा प्रमुख उद्देश आहे.
🌿 गोसेवा आयोगाची विनंती 🌿
प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे गोमय उत्पादनांची माहिती प्रसारित करण्यात येत आहे. सर्व नागरिकांनी वैयक्तिक स्तरावर जागरूक राहून ही पर्यावरणपूरक, स्थानिक आणि नैसर्गिक उत्पादने खरेदी करावीत, अशी नम्र विनंती आहे.
सर्व उत्पादक, गोशाळा, संस्था आणि यंदाच्या दिवाळीत गोमय दिवे, लक्ष्मी मूर्ती, साबण, उटणे व इतर नैसर्गिक उत्पादने वापरण्यास उत्सुक असलेल्या नागरिकांना आगामी दिवाळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
