करमाळा प्रतिनिधी
श्री रामचंद्र बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी यांच्या हस्ते करमाळा पुरग्रस्थांना मदत करण्यात आली आहे.
तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सप्लाय इन्स्पेक्टर दिव्यश्री ढोबळे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली आहे. यावेळी विविध पुरग्रस्त भागातील नागरिक व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी करमाळा तालुक्यातील निलज, पोथरे, कामोने, बिटरगाव श्री, पोटेगाव, बाळेवाडी, बोरगाव, दिलमेश्वर, वडाचीवाडी, आळजापूर, खडकी, घारगाव, तरटगाव, पाडळी, करंजे, कोर्टी, मिरगव्हाण, आवाटी, जातेगाव, जेऊर, कोंढेज आदी पुरग्रस्थांना अन्नधान्य,जीवन आवश्यक किट व जनावरांना मुरग्रास, पेंड आदी देण्यात आले होते.