
करमाळा प्रतिनिधी
शेटफळ तालुका करमाळा येथील ओंकार ज्ञानदेव लबडे याची सध्या मालदीव येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय कॉमनवेल्थ हँडबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

16 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर मालदीव येथे होणाऱ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कॉमन वेल्थ हँडबॉल स्पर्धे साठी मालदीव, भारत, बांगलादेश, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका व श्रीलंका या देशातील संघ सहभागी झाले आहेत. भारतीय हँडबॉल संघात निवड झालेला लबडे हा नूतन करमाळा तालुका हँडबॉल असोसिएशनचा खेळाडू असून तो आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारताच्या संघात निवड झालेला. हा हँडबॉल खेळातील तालुक्यातील पहिला खेळाडू आहे. ही निवड हँडबॉल असोसिएशन इंडिया चे सहसचिव रुपेश दादा मोरे, हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र चे महासचिव राजाराम राऊत सर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. ओंकारचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जेऊर येथील भारत हायस्कूल येथे झाले. यानंतर त्याने कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील शेतकी महाविद्यालयातून शेतकी विषयातील पदवी शिक्षण पूर्ण केले असून सध्या तो पुणे यथे एम.बी.ए.चे शिक्षण पूर्ण करत आहे. जेऊर येथील भारत हायस्कूल येथे प्राथमिक शिक्षण घेत असतानाच त्याला हँडबॉल खेळाविषयी गोडी निर्माण झाली. यानंतर त्याने या खेळाचा सराव कायम ठेवला. याकाळात नूतन करमाळा तालुका हँडबॉल असोसिएशनचे सचिव विनोद गरड यांचे त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
करमाळा तालुक्यातील तो पहिला आंतरराष्ट्रीय हँडबॉल खेळाडू असून त्याच्या निवडी बद्धल आमदार नारायण आबा पाटील, सभापती अतुल भाऊ पाटील, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. अर्जुनराव सरक यांनी अभिनंदन केले आहे. नूतन करमाळा तालुका हँडबॉल असोसिएशन जेऊर चे अध्यक्ष संतोष नुस्ते, दत्तात्रय वाघमोडे, विनोद गरड, यांनी अभिनंदन केले आहे.