करमाळा प्रतिनिधी

करमाळा मतदार संघातील बांधकाम कामगारांची नोंदणी माजी आमदार संजयमामा शिंदे संपर्क कार्यालय यांच्या वतीने मोफत करून देण्यात आलेली होती. सदर बांधकाम कामगारांनी ऑनलाईन अर्ज नोंदणी केल्यानंतर त्यांना मिळणाऱ्या गृह उपयोगी वस्तूंचे वाटप काल दिनांक 15 रोजी माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अर्बन बँकेचे माजी चेअरमन कन्हैयालाल देवी, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, रामभाऊ ढाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भरत भाऊ अवताडे, शिवराज जगताप, तात्यामामा सरडे, सुजिततात्या बागल, राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसचे सदस्य अजिंक्य जाधव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अश्पाक जमादार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी 139 लाभार्थींना गृहपयोगी वस्तूंच्या 30 भांड्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना सुजित तात्या बागल म्हणाले की, माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून करमाळा संपर्क कार्यालयाच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, आमदार आपल्या दारी… शासकीय योजना पोहोचतील घरोघरी यासारखे उपक्रम गेल्या पंचवार्षिकमध्ये राबविण्यात आल्यामुळे त्याचा फायदा अनेक सर्वसामान्य मतदारांना झाला. सध्या संपर्क कार्यालयाकडून 2200 बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली असून बांधकाम कामगारांना मिळणारे सर्व लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून ते लाभ त्यांना मिळवून देऊ.

हे होणार बांधकाम कामगारांना फायदे –

मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, कामगाराच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना दोन लाखांपर्यंत आरोग्य उपचारांमध्ये सूट, मुलीच्या विवाहासाठी अनुदान, घरकुल आवास योजनेसाठी अनुदान, मृत्यू नंतर वारसाला आर्थिक मोबदला मिळणार.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *