
करमाळा प्रतिनिधी
चिखलठाण तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे दि. 12/9/2025 रोजी सकाळी महाराष्ट्र शासन कृषी विभाग व चिखलठाण ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना व महिला शेतकरी मेळावा व प्रक्रिया उद्योग कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चिखलठाण ग्रामपंचायत सरपंच धनश्रीताई विकासबापू गलांडे यांनी भूषविले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक सहाय्यक कृषी अधिकारी सुप्रिया शेलार मॅडम यांनी केले. तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके यांनी महिलांच्या गटांनी एकत्र येऊन शेतीवर आधारित उत्पादनावर प्रक्रिया उभारा. प्रक्रिया व्यवसाय उभारण्यासाठी कृषी विभाग व ग्रामपंचायत यांच्याशी संपर्क साधा. एक चांगला उद्योजक व्हायाला कृषी विभाग संपूर्ण सहकार्य करेल. मनोज बोबडे (जिल्हा संसाधन व्यती) प्रधानमंत्री सूष्म अन्न प्रक्रिया (PMFME ) या योजनेचा महिलांनी लाभ कसा घ्यायचा ? 10 लाखापर्यंत अनुदान कसे मिळते व कोणते व्यवसाय येतात ? पॅकेजिंग व मार्केटिंग तालुक्यातील यशस्वी उद्योग कसे तयार झाले ? योजनेसाठी लागणारे कागदपत्रकांची सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. प्रताप तळेकर (उप कृषी अधिकारी) सर्व कृषी विभागाच्या योजनेची माहिती दिली. समाधान खूपसे व मन्सूर पठाण यांनी PMFME योजनेला Aif व Cif यांचा लाभ कसा मिळतो व्यवसायाची निवड कशी करावी यावर मार्गदर्शन केले. आभार विकास सेवा सोसायटी चेअरमन चिखलठाण विकास बापू गलांडे यांनी मानले.

तालुका कृषी अधिकारी करमाळा राजेंद्र नेटके, मंडल कृषी अधिकारी मधुकर मारकड, अनिल चव्हाण, प्रताप तळेकर, कोकणी, सचिन जगदाळे, रोहिनी गायकवाड मॅडम, वर्षा निकत मॅडम, प्रा. अर्जून सरक सर, प्रवक्ते सुनील तळेकर सर, प्रा.डॉ.संजय चौधरी सर, मन्सूर पठाण, प्रविण शिंदे, समाधान खुपसे माढा, सत्यम झिंजाड़े (आत्मा), उदयोजीका उषा आढाव, रावसाहेब नेमाणे, गोडगे सर, संचालीका उर्मिला सरडे, संचालक महादेव सरडे, कुगाव सरपंच सागर पोरे, पै. वीरेंद्र प्रताप गलांडे, संभाजी कांबळे, रेणूका पवार, सरडे, मारुती गायकवाड व इतर मान्यवर, महिला माता भगिनी, ग्रामस्थ, युवा वर्ग चिखलठाण उपस्थित होते.