करमाळा प्रतिनिधी

करमाळा रोशेवाडी रोडवर वाहतूक वाढली आहे. केत्तुर नाक्याजवळील चारही रस्त्यावर गतिरोधक करावा अशी मागणी आजुबाजुच्या गाळेधारकांनी केली आहे.

येथुन करमाळा तहसील, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, कोर्ट, काँलेज, शाळा आदी कार्यालय आहे. वाहतूक भरपूर असते. येथे वारंवार किरकोळ मोठे अपघात होत आहे.

याबाबतचे अर्ज मुख्याधिकारी करमाळा यांना देण्यात आले आहे. अर्जात असे लिहिले आहे की, करमाळा शहरातील केत्तुर नाका येथे गतिरोधक करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण या नाक्यापासून पुणे, कर्जत, कचेरी रोड आणि करमाळा शहराकडे जाणारा महत्वाचा चौक आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. सदर परिसरातून वाहने खूप तीव्र गतीने जातात. त्यामुळे सदर परिसरामध्ये वारंवार अपघात घडत आहेत. त्यामुळे अनेकांना दुखांपती होणे, अपंगत्व येणे, जीव जाणे असे प्रकार घडत आहेत. या ठिकाणी काही दिवसांपूर्वी कै. प्रदीप शिंदे नामक दुकानदाराला वाहन धडकून त्याचा मृत्यु झाला आहे. वास्तविक पाहता या ठिकाणी पुर्वी गतिरोधक अस्तित्वात होते परंतु रस्ता खडीकरण आणि डांबरीकरणामध्ये सदरचे गतिरोधक बुजले आहेत. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक करण्यात यावे.

अशी विनंती पत्रकार जयंत दळवी, कृष्णा पवार, गोपीचंद थोरात, प्रमोद कांबळे, दत्तात्रय थोरात, समीर सय्यद, चेतन क्षिरसागर, नितीन कडवकर, कय्युम शेख, दत्तू कांबळे, रुपेश साळुंखे, भागवत चव्हाण, आजिनाथ कोंगे, संतोष जगताप, महादेव यादव, ज्ञानेश्वर दळवी, विकास सुरु व परिसरातील सर्व गाळाधारकांनी मागणी केली आहे. नगरपालिका अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर गतिरोधक करावे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *