
करमाळा प्रतिनिधी
26 व 27 जुलै रोजी होणाऱ्या ऑनलाईन अबॅकस आंतरराष्ट्रीय परीक्षेसाठी जेऊर येथील इरा पब्लिक स्कूल मुथा नॉलेज फाउंडेशन मधून या स्पर्धेमध्ये विद्यार्थी सहभागी आहेत. या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सात मिनिटात 100 गणिते सोडवणे बंधनकारक आहे. मॉक टेस्ट च्या माध्यमातून विद्यार्थी प्रॅक्टिस करत आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे संस्थापक प्राध्यापक सुनील अवसरे, मुख्याध्यापिका अवसरे मॅडम व सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना यशासाठी शुभेच्छा दिल्या.

ऑनलाइन अबॅकस आंतरराष्ट्रीय स्तरावर इरा पब्लिक स्कूल मधून सहभागी विद्यार्थी
शर्विल माने, संस्कृती रोकडे, मैत्रेय सुरवसे, वीर प्रताप चौधरी, राजवीर पोळ, वेदांत रोडे, सम्यक अवसरे, प्रज्वल सातव, स्वराज तकिक, अथर्व, तकिक, केतकी कुलकर्णी, श्रुती मोरे
सर्व विद्यार्थ्यांना ज्योती मुथा व स्मिता वनारसे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

