करमाळा प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी करमाळा शहर मंडलाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  या रक्तदान शिबीरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. यामध्ये एकूण ३५७ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी तालुका अध्यक्ष काकासाहेब सरडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात महारक्तदान अभियान राबविण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून आम्ही आमचे नेते गणेश भाऊ चिवटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा संपर्क कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबीरामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून सामाजिक कार्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, रामभाऊ ढाणे, जेष्ठ नेते भगवानगिरी गोसावी, बाळासाहेब कुंभार, सुर्यकांत पाटील, तालुका सरचिटणीस नितीन झिंजाडे, आजिनाथ सुरवसे, अमोल पवार, दादासाहेब देवकर, बंडू शिंदे, सोमनाथ घाडगे, लक्ष्मण शेंडगे, राजु सय्यद, हर्षल शिंगाडे, प्रकाश ननवरे, संजय जमदाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *