
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यात मोहिदिन तालीम येथे सवारीच्या अनुषंगाने मोहरम ची सुरुवात झाली. मुस्लिम समाजाचे अध्यक्ष उस्मान शेठ तांबोळी, माजी नगरसेवक अल्ताफ शेठ तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली. यावेळी पोलीस निरीक्षक रणजीत माने, माजी नगरसेवक संजय सावंत, प्रशांत ढाळे, शौकत नालबंद, जाकीर वस्ताद, सोहेल पठाण, समीर शेख, बंडू शेख, इंदाज वस्ताद, मुस्तकीन पठाण आदि जण उपस्थित होते.

उपस्थितांमध्ये मोहरमचा जोश होता व मिरवणूक शांतपणे पार पाडणार अशी ग्वाही मुस्लिम समाजाचे नेते तथा माजी नगरसेवक अल्ताफ शेठ तांबोळी यांनी दिली.
