
करमाळा प्रतिनिधी
मांजरगाव ता.करमाळा येथे राजर्षी शाहू महाराज जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील नव्याने स्थापन झालेल्या शिव शाहू फुले आंबेडकर फाउंडेशन सह सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत जयंती साजरी केली. ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष संतोष पाटील यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन

करण्यात आले. यावेळी व्याख्याते प्रा.नंदकिशोर वलटे यांचे “शाहू महाराजांचा विज्ञानवादी दृष्टीकोन” या विषयांवर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यात त्यांनी छत्रपती शाहू महाराज हे सर्वधर्मसमभाव जपणारे,स्त्री स्वातंत्र्याचा लढा लढणारे द्रष्टे राजे होते. रयतेला सर्वोच्च मानून त्यांनी ज्या योजना राबविल्या त्या आत्ताच्या राजकर्त्यांनी अंगिकारल्या पाहिजेत असे मत मांडले. तसेच मांजरगावच्या धर्तीवर प्रत्येक गावात शिव शाहू फुले आबेडकर विचारांची तरुण पिढी तयार झाली पाहिजे ही

अपेक्षा व्यक्त केली. यावेळी शालेय विद्यार्थी कु.तनुजा हुंबे व शिवराज हुंबे यांनी छत्रपती शाहू महाराजांविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश हुंबे यांनी केले त्यात त्यांनी शाहू महाराजा सारख्या समाजसुधारक राजाचा विचार गावागावातील लहान मुलांपर्यंत पोहचणे काळाची गरज असल्याचे सांगितले. आभारप्रदर्शन करताना प्रा.डॉ. संजय चौधरी यांनी अंधश्रद्धा, कर्मकांड यांच्या आहारी जाणारा आपला समाज विज्ञानवादी बनवला पाहिजे व समाजविघातक ब्रह्मण्यवाद समूळ नष्ट केला पाहिजे हेच खरे महाराजांच्या विचारांना अभिवादन असेल असे सांगितले. व गावातील तरुणांनी पुढाकार घेत करत असलेल्या समाजकार्यास शुभेच्या दिल्या.आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे शाहू महाराजांची जयंती सणासारखी लाडू वाटत करून साजरी करत असल्याचे सांगितले.

शिव,शाहू, फुले,आंबेडकर फौडेंशनचे अध्यक्ष संतोष साहेबराव पाटील, जगत्गुरू तुकोबाराय सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष रविद्र जावळे, नवनाथ गरदडे, उत्तरेश्वर चव्हाण, भाऊ रेवननाथ चव्हाण,कार्याध्यक्ष, वैभव हुंबे, ज्ञानराज सुपे, रामहरी बागडे,गणेश हुंबे, गौतम खरात, अमित हुंबे, समाधान फराटे, महिबूब पठाण, नशिर पठाण, सचिन खरात, अरविंद खरात, आण्णा खरात, पिंटू मोरे चेअरमन, राजेंद्र काळे इत्यादी नागरिक उपस्थित होते.

……………..
‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम’
गावातील समाजसुधारक विज्ञानवादी विचारांच्या तरुणांनी एकत्र येत. या फाऊंडेशनची स्थापना केली आहे. गावात विविध सामाजिक उपक्रमाबरोबर जुन्या वाईट चाली रीती, धर्मांधता संपवणे तसेच गावात सामाजिक सलोखा निर्माण करणे. अंधश्रद्धा कर्मकांड यामुळे होणारी गावकऱ्यांची लूट थांबवणे हे कार्य फाऊंडेशन करणार आहे. याचाच भाग म्हणून महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथी साजऱ्या केल्या जाणार आहेत. या फाऊंडेशनच्या शाखा महाराष्ट्रभर उभारल्या जाणार आहेत.