
करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगरपरिषदेने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान या योजनेतुन श्री मारुती मंदिर परिसरातील काँक्रीटीकरण काम मंजूर केले होते. संबंधित ठेकेदारास कामाची वर्क ऑर्डर पण दिली होती परंतु ठेकेदारानी सदरचे काम मुदतीत चालू केले नाही.

ठेकेदाराने सहा महिने ची मुदत संपली तरी पण काम केले नाही. सदरची बाब माजी नगरसेवक फारुक जमादार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गेली तीन चार महिन्यांपासून या कामाचा पाठपुरावा केला. प्रसंगी त्यांनी १७ मार्च २०२५ रोजी उपोषण करणार असल्याचे पालिकेस लेखी कळविले होते त्यानंतर मुख्याधिकारी व बांधकाम अभियंता यांनी लेखी पत्र दिल्यानंतर सदरचे काम सुरू झाले आहे.


