करमाळा प्रतिनिधी

वांगी नं. २ ते इजीमा १२ ला जोडणारा रस्ता ग्रामा ६१ किमी ०/०० ते ३/०० हे काम इस्टीमेट प्रमाणे होत नसून, कमी मटेरियल मध्ये होत असून ठेकेदार व अधिकारी मिळून हा रस्ता संगनमत करून बनवत आहे तरी त्वरित कारवाई करावा असे निवेदन उपविभागीय अभियंता सा.बां.वि. करमाळा यांना जनशक्ती शेतकरी संघटनेचे युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश भानवसे यांनी दिले.

निवेदनात असे लिहिले आहे, वांगी नं. २ ते इजीमा १२ ला जोडणारा रस्ता ग्रामा ६१ किमी ०/०० ते ३/०० हे काम चुकीच्या पद्धतीने चालू आहे. डांबर खडी जेवढा टाकावा लागेल तेवढा टाकलेला नाही. त्यामध्ये एक थर टाकलेलाच नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी चारी खोदलेली नाही बाहेरून कसल्याही प्रकारचा मुरूम आणलेला नाही. तरी त्वरित याची चौकशी होऊन ठेकेदार आणि संबधित अधिकारी यांच्या यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करावा. आणि शासनाचे वायपट जाणारे पैसे थांबवावेत.

गेल्या अनेक वर्षा पासून वांगी नं.२ या गावाला रस्ता मिळालेला नाही. सर्व सामान्य गरीब शेतकरी ज्या वेळेस गावातून पालेभाज्याची वाहतूक करतो, विध्यार्थी शिक्षणासाठी जेऊर, करमाळा या ठिकाणी जातात. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून आम्ही या संकटाना सामोरे जात आहोत. तरी हा रस्ता जर उत्तम दर्जाचा नाही झाला तर परत एकदा हा रस्ता खराब होण्याची दाट शक्यता आहे.

वांगी नं.२ या गावा पासून शहराला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. वांगी नं.२ या गावामध्ये कसल्याही प्रकारची दवाखान्याची सोय नाही त्यामुळे करमाळ्या ठिकाणी जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. तरी विनंती करतो कि, त्वरित संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई कारवाई अन्यथा दि. ०२/०७/२०२५ या रोजी आपल्या कार्यालय समोर आंदोलन करण्यात येईल.

या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, सचिव सो. सा.बा. विभाग, मुख्य अभियंता सेन्ट्रल बिल्डींग मुंबई, जिल्हाधिकारी सोलापूर, अधीक्षक अभियंता सा. बा. विभाग सोलापूर, कार्यकारी अभियंता सा. बा. विभाग अकलूज, उपविभागीय अभियंता सा. बा. विभाग करमाळा, आमदार करमाळा, तहसीलदार करमाळा, पोलीस निरीक्षक करमाळा यांना देण्यात आले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *