करमाळा प्रतिनिधी

महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड मोठ्या संकटाला सामोरे जात असताना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यापेक्षा शेतमजुरांचे उत्पन्न जास्तीचे आहे. शेतीसाठी लागणारी मशागत, मजूरी, खते, बी-बीयाणे, औषधांची झालेली प्रचंड महागाईमुळे शेती करणे तोट्याचे बनले आहे. शासकीय सर्व्हंनुसार राज्यात दिवसाला आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. याला जबाबदार चुकीचे शेती धोरण व सरकार जबाबदार आहे. शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन अयोग लागू होणे गरजेचे आहे. निवडणुकपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे सरकार आले की, शेतकऱ्यांचा उतारा कोरा करणार म्हटले होते त्याचे काय झाले ? आत्ता मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांना कर्जमाफीचा विसर पडलाय का ? यांना सत्तेची मस्ती चढली आसल्याचा अरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांनी प्रसिद्ध निवेदनाद्वारे म्हटले आहे. या निवेदनाची प्रत करमाळा निवासी नायब तहसीलदार विजय लोकरे यांना देण्यात आली. यावेळी रासप जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, बाळासाहेब टकले, जगन्नाथ सलगर, नामदेव पालवे, शिवाजी खटके, विकास मेरगळ, सुधीर ठोंबरे, सुनील बंडगर, रघुनाथ खटके, यशवंत सलगर, शंकर सुळ, दिपक कडू इत्यादी पदाधिकारी उपस्थितीत होते.

यावेळी पुढे बोलताना देवकते म्हणाले की, भाजप सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा-कोरा करणार म्हणणारे आत्ता बिळात लपले आहेत ? करमाळा तालुक्यात प्रचंड अतिवृष्टी झालेली अजून त्यांचे पंचनामे देखील पूर्ण होऊन देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही आर्थिक मदत मिळाली नाही. या तिघाडी सरकारला शेतकऱ्यांचे देणें-घेणे नाही आसे यावरून वाटते. निवडणूकी पूर्वी शेतकऱ्याला जो शब्द दिला तो शब्द पाळण्या ऐवजी कृषी मंत्री शेतकऱ्यांची थट्टा उडवत आहे. जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा आणि तालुक्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना तात्काळ पैसे देण्यात यावेत, अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *