
करमाळा जयंत दळवी
करमाळा शहरातील विविध समस्या बाबत करमाळा शहर विकास आघाडीच्या वतीने करमाळा नगरपरिषदे समोर सुनील बापू सावंत यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले असून मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी आज पासून कामास सुरुवात केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन संपले. यावेळी शहर विकास आघाडीचे नेते सुनील बापू सावंत यांनी मुख्याधिकारी सचिन तपसे यांना निवेदन दिले आहे.

शहर विकास आघाडीच्या वतीने आज बोलताना सावंत म्हणाले की, करमाळा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना पाच पाच दिवस पाणी भेटत नाही, करमाळा शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. आता आषाढी एकादशी येत आहे लाखो भाविक एकादशी साठी पंढरपूर येथे जातात. खड्डयात पडुन कोणतीही इजा होऊ नये त्यामुळे लवकरात लवकर खड्डे बुजवण्यात यावे व शहरातील गटारी तुडुंब भरले आहे, शहरात कचरा साचलेला आहे या सर्वाची स्वच्छता करण्यात यावी. तसेच आषाढी एकादशी पुर्वी शहरात जंतू नाशक पावडर व फिनेल ची त्वरित फवारणी

करण्यात यावी आदी मागण्या साठी आज शहर विकास आघाडीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. आंदोलन यशस्वी करण्यासाठी सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत, माजी नगरसेवक फारुक जमादार, माजी नगरसेवक रवींद्र कांबळे, माजी नगरसेवक दिपक सुपेकर, भारिप चे नेते देवा लोंढे, हुमरान मुलाणी, गणेश अडसूळ, पांडुरंग सावंत, साजीद बेग, विलास क्षिरसागर, साबीर नजीर शेख, बापू मोरे, जमीर सय्यद, राजेंद्र कसाब, बापू उबाळे, भाऊ दुधाळ, जमील काजी, संभाजी गायकवाड, मार्तंड सुरवसे, दत्ता कांबळे, आदी जण उपस्थित होते. यावेळी पोलीस कर्मचारी बिभीषण जाधव, गणेश दळवी, भाऊसाहेब शेळके, गणेश शिंदे यांनी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता.