करमाळा प्रतिनिधी

शैक्षणिक वर्षाची सुरुवात म्हणजे विद्यार्थ्यांसाठी नवीन स्वप्नांची आणि आत्मविश्वासाच्या प्रवासाची पहिली पायरी. नगरपरिषद मुलींची शाळा क्र. 2 येथे झालेला प्रवेशोत्सव हा केवळ औपचारिक कार्यक्रम न ठरता, विद्यार्थ्यांना आनंद आणि प्रेमाने भरलेला अनुभव देणारा क्षण ठरला.

सामाजिक कार्यकर्ते संतोष कांबळे यांच्या पुढाकाराने आणि नियोजनाने हा उपक्रम अत्यंत आनंदमय वातावरणात पार पडला. नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत कॅडबरी चॉकलेट, पुष्पगुच्छ, व खाऊ वाटप करून अतिशय आत्मीयतेने करण्यात आले. त्यांच्या चेहऱ्यावरील हसू आणि उत्साह वातावरणात सकारात्मक ऊर्जा पसरवत होते.

शाळेच्या परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. रंगीबेरंगी फुगे, पताका आणि स्वच्छतेची विशेष व्यवस्था यामुळे शाळा एकदिवसीय सणासारखी भासत होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक बलभीम शिंदे सर यांनी तर आभार प्रदर्शन जोशी मॅडम यांनी केले.

या प्रसंगी नव्याने नियुक्त झालेल्या भालचंद्र निमगिरे सर यांचा शाल, श्रीफळ व फुलांनी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेवक संजय सावंत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या शुभेच्छा देताना, “शाळा ही संस्कारांची आणि ज्ञानाची पहिली शिदोरी असते, या वयात चांगल्या सवयी लागाव्यात यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे,” असे सांगितले.

या सोहळ्याला माजी नगरसेवक फारूक जमादार, माजी नगरसेवक सुपेकर, मनोज कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते संतोष कांबळे, गोपाल वाघमारे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *