करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुका रिपब्लीकण पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षाची मिटींग सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव गाडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. सदर मिटींग ता. अध्यक्ष अमोल कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पड़ली. यावेळी सोलापूर येथे झालेल्या भारतीय सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठी भारत जिंदाबाद रॅलीला करमाळा तालुक्याला आमंत्रीत

केल्यामुळे सोलापूर जिल्हा कमीटीचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी अर्जुनराव गाडे यानी आपल्या भाषनात मित्र पक्षाने आम्हाला विश्वासात न घेतल्यास जिल्हापरिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्थाचे विलक्षण आरपीआय (आठवले) स्वबळावर लढवणार तसेच शासनाच्या नवीन आलेल्या स्किमा वंचिताना मिळाल्या पाहीजे. यासाठी कार्यकर्त्याने कामाला लागावे असे सांगीतले. यावेळी बाळासाहेब टकले आरपीआय धनगर आघाडीचे जिल्ह्याचे नेते, अमोल कदम ता. अध्यक्ष,

सुरेश धेंडे, दत्तात्रय बनसोडे यांची भाषणे झाली. शेवटी आभार राजेंद्र सरतापे ता. कार्याध्यक्ष रिपाई यांनी आभार मानले. यावेळी रघुनाथ थोरात, विलास खरात, भैय्या कदम, बबन सले, मनोहर शिंदे, पोपट कदम, भागवत गायकवाड, राजू कांबळे, गौतम देडगे, महादेव सरतापे, श्रावण कदम, प्रकाश खरात, आदी जण उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *