करमाळा प्रतिनिधी

दि. २६/०५/२०२५ रोजी पो.नि. रणजीत माने यांना गोपणीय माहिती मिळाली की, केम ते वडशिवणे रोडने एक चारचाकी गाडी अवैधरित्या देशी-विदेशी दारुची वाहतुक करीत येणार आहे अशी बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी कारवाई करणे करीता अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाळा उपविभाग, करमाळा यांना माहीती देवून कारवाई करीता पो.हवा./ १८४५ अलिममलिक शेख, पो.शि./२००७ अमोल घुगे व पो.शि./ १३२९ प्रविण चव्हाण, सर्व नेम: करमाळा पोलीस ठाणे यांना सुचना देवुन रवाना केले. ते मौजे केम गावचे हद्दीतील वेताळबाबा मंदीराजवळ जावुन थांबले असता त्यांना एक चारचाकी महिंद्रा बोलेरो गाडी येत असताना दिसली. तीचा त्यांना संशय आल्याने त्यांनी गाडी थांबवुन गाडीची तपासणी केली असता त्यात एकुण ४७,०१४/- रु. किंमतीचे देशी-विदेशी दारुचे बॉक्स व त्यामध्ये देशी-विदेशी दारुच्या बाटल्या मिळुन आल्या. तसेच सदर गाडीचे चालक सदाशिव अजय मराठे, वय २८ वर्षे, रा. निमगाव (टें), ता. माढा, जि. सोलापूर यास तसेच अंदाजे ५,००,०००/- रु. किंमतीची एक महिंद्रा बोलेरो गाडी क्र. एम. एच. ४५ / ए.क्यु. – ४७५९ असा एकुण ५,४७,०१४ /- रु. किंमतीचा मुद्देमाल पंचांसमक्ष पंचनामा करुन पुढील कारवाईसाठी ताब्यात घेवुन त्याचेवर कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर सोलापूर ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील करमाळा उपविभाग, करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली, पो. नि. / रणजीत माने, पो. हवा./१८४५ अलिममलिक शेख, पो.शि. / २००७ अमोल घुगे व पो.शि./ १३२९ प्रविण चव्हाण, सर्व नेम: करमाळा पोलीस ठाणे यांनी केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *