करमाळा प्रतिनिधी

आमदार नारायण आबा पाटील आज अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भेटी देणार असल्याची माहिती आमदार कार्यालयाकडून मिळाली आहे. करमाळा तालुक्यातील तसेच करमाळा विधानसभा मतदारसंघास जोडलेल्या कुर्डुवाडी सह छत्तीस गावात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. गेली दोन आठवडे सतत आलेला पाऊस व सोबत वादळवारा

यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे कांदा, केळी, डाळींब, ड्रॅगन फळ यासख्या फळबागांची तसेच पिकांची नासाडी झाली असुन आमदार नारायण आबा पाटील यांनी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर दोन लाख रुपये नूकसान भरपाई द्यावी अशी मागणी शासनाकडे केली असल्याने आजचा त्यांचा दौरा हा या मागणीस बळकटी देणारा आहे. या दौऱ्यात

आमदार नारायण आबा पाटील हे चिखलठाण, शेटफळ, शेलगाव वांगी, यासह तालुक्यातील काही नुकसान झालेल्या गावात प्रत्यक्षात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटी देऊन पिकांची पाहणी करणार असुन त्यांचे समवेत तालूका कृषी अधिकारी देवराव चव्हाण तसेच त्या विभागातील महसुल‌ विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार नारायण आबा पाटील कार्यालयाकडून सांगण्यात आली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *