
करमाळा प्रतिनिधी
जुनी करमाळा नगर परिषद मधील गणपती मंदिर धोकादायक झाले आहे. बाजुचे नागरिक भयभीत झाले आहे. नगर परिषदेने त्वरित दखल घ्यावी अशी मागणी रहीवाशीयांनी केली आहे.

करमाळा शहरातील असंख्य नागरिक गणपती मंदिरात रोज सकाळी दर्शन घेण्यासाठी येत आहेत तसेच असंख्य नागरिक बाजुच्या बोळीतील रस्त्याने ये जा करत असतात त्यांच्या जिवतास धोका निर्माण झाला आहे. या बाबत पुर्वी करमाळा नगर परिषद मुख्याधिकारी कर्मचारी यांना सांगितले होते व आता ही सांगितले आहे. तरी पाऊस चालू आहे लवकरात लवकर दखल घ्यावी अशी रहीवाशीयांनी मागणी केली आहे.
