करमाळा प्रतिनिधी

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून हेक्टरी दोन लाखांची भरपाई शेतकऱ्यांना द्या, अशी मागणी करमाळा मतदार संघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी केली आहे. जिल्हाधिकारी यांना याबाबत एक लेखी निवेदन आमदार नारायण आबा पाटील यांच्या कडून पाठवले गेले आहे. याबाबत अधिक माहिती देताना आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले की करमाळा मतदार संघात गेले दहा दिवस अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यामुळे कांदा,

केळी, डाळींब, द्राक्षे, आंबा यासह अनेक पिके व‌ फळबागाचे तसेच भाजीपाला म्हणजेच तरकारीचेही सर्वात जास्त नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या पावसाने शेतातील उभी पिके हातातुन गेलीच पण अनेक ठिकाणी वादळवाऱ्या मुळे फळबागांची प्रचंड प्रमाणात नुकसानी झाली आहे. यामुळे महसुल व कृषी विभागाने एकत्रित येऊन करमाळा मतदार संघातील नुकसान झालेल्या भागात पाहणी करावी. नुकसान झालेल्या पिकांचे जागीच पंचनामे केले जावेत व तसे अहवाल तथा

नुकसानीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत. जेणेकरून शेतकऱ्यांना याबाबतची नुकसान भरपाई मिळत असताना अडचण येणार नाही व दिरंगाई होणार नाही. साधारणपणे करमाळा तालुक्यातील केळी व कांदा यासह इतर पिकांच्या उत्पादनात आता घट होईल असे दिसुन येते यामुळे शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई दिली जावी अशी मागणी आमदार नारायण आबा पाटील यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी यांचेसह कृषी मंत्री, महसुल मंत्री, पालकमंत्री आदिंना पाठवण्यात आल्या आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *