करमाळा प्रतिनिधी  

करमाळा तालुक्यातील प्रलंबित असलेली रिटेवाडी उपसा सिंचन योजना लवकरात लवकर मार्गी लावली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या सिंचन योजनेबाबत मंत्रालयात बैठक लावण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावेळी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील नागरिकांना व शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण असणारी रिटेवाडी उपसा सिंचन योजना लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी यावेळी केली. या नागरी मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

तसेच यावेळी पुणे जिल्ह्यातील वेल्ह्याचा राजगड तालुका व्हावा आणि SSPE आजारग्रस्त असणाऱ्या मुलांना मदत मिळावी, याबाबतची मागणीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. यावेळी उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत साळुंखे यांनी याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. वेल्ह्याचा राजगड होण्याबाबत आणि SSPE आजार ग्रस्त मुलांना तातडीने मदत देण्याबाबत मंगळवारी कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *