
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्याचे जमिनीचे अवकाळी पाऊस, वार्यामुळे झालेले नुकसानीचे पंचनामे त्वरीत करण्यासाठी करमाळा तहसील यांनी तलाठी मंडल अधिकारी यांना द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष संजय (बापु) घोलप यांनी केली आहे.

सध्याची परिस्थितीत शेतकरी वर्ग हा खुप आडचणीत आला आहे. पाणी आहे तरं लाईट नाही, नेहमी शेतकऱ्याचे निसर्गा बरोबर लढाई चालु असते, त्यात शेत मालाला भाव मिळत नाही, आणी अशातच जर दोन पैसे लावुन कुठेतरी शेतातील पिक हातात येईल असं वाटत असताना आवकाळी पाऊस, वार्यामुळे झालेले नुकसान हे न सोसनारे आहे. तरी त्वरीत तहसीलदार

यांनी करमाळा तालुक्यातील शेतीच्या व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून मदत मिळण्यास मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा तालुका व शहर च्या वतीने करत आहोत.
तसेच शेतकऱ्याचे जनावरांचे पण वीज अंगावर पडुन मुत्य झाले आहेत त्याची हि नुकसान भरपाई मिळावी हि विनंती.