करमाळा प्रतिनिधी

समाजसेवा मित्र मंडळाचे कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाची विद्यार्थिनी सई तनपुरे हिचा यावर्षीच्या यशस्वी परीक्षेमध्ये करमाळा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. संस्था सचिव गुलाबराव बागल यांनी सई तनपुरे तिच्या पालकासह घरी बोलावून तिला गुच्छ व रोख 1000 रुपये बक्षीस देऊन सत्कार केला गुलाबराव बागल यांची प्रकृती

वयोमानाप्रमाणे थोडी नाजूक असल्यामुळे विद्यार्थिनी व तिच्या पालकाला त्यांनी घरीच बोलावून सत्कार केला. सई तनपुरे हिचा करमाळा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. यापूर्वीही गेले दोन वर्ष विद्यालयाची विद्यार्थिनी करमाळा तालुक्यामध्ये प्रथम आलेले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *