करमाळा प्रतिनिधी

जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे धर्म विचारून आतंकवाद्यांनी भारतीय नागरिकांना गोळ्या घालून ठार केले होते. यावर भारत सरकारने लष्कराला आदेश देऊन पाकिस्तानला धडा शिकवला. भारतीय सेनेने पहलगाम दहशतवादी हल्ल्यात दुर्दैवाने मृत्युमुखी सर्व पीडितांना आपल्या भारतीय सशस्त्र दलाने न्याय मिळवून दिला. या ऑपरेशनदरम्यान भारतमातेच्या वीरपुत्रांनी दाखविलेल्या शौर्य, संयम आणि बलिदानाच्य सन्मानार्थ करमाळा शहरात ‘भव्य तिरंगा यात्रा’ संपन्न झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील नवा भारत प्रसंगी दहशतवादाविरुद्ध किती कठोर, कणखर होऊ शकतो; हे ‘ऑपरेशन सिंदूर’ मुळे संपूर्ण जगाने पाहिले आहे.यानिमित्ताने दिसलेल्या नव्या भारताच्या लष्करी सामर्थ्या सोबतच कोट्यवधी भारतीयांची एकजूट हे ‘ऑपरेशन सिंदूर’चे मोठे यश आहे हे या रॅलीतील दिसून आले.

श्री खोलेश्वर मंदिर किल्ला विभाग येथून सुरू झालेली तिरंगा यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांना अभिवादन करून यात्रेचा राष्ट्रगीताने समारोप झाला. या रॅलीच्या मार्गात करमाळा येथील नागरिकांनी रॅलीवर विविध ठिकाणी पुष्पवृष्टी केली.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. श्रीराम परदेशी, भाजपा नेत्या रश्मी बागल, भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, शिवसेनेचे दिग्विजय बागल, जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, रामभाऊ ढाणे, करमाळा मंडल अध्यक्ष काकासाहेब सरडे, करमाळा ग्रामीण मंडल अध्यक्ष सचिन पिसाळ, माजी सैनिक हंसराज पाटील, किरण बोकण, दिपक चव्हाण, नितीन झिंजाडे, सोमनाथ घाडगे, आजिनाथ सुरवसे, संदिप काळे, विकास गायकवाड, लक्ष्मण शेंडगे, पत्रकार जयंत दळवी, दिनेश मडके, राजु सय्यद, अजिंक्य पाटील, आश्पाक जमादार, हर्षद गाडे, महिला आघाडीच्या राजश्री खाडे, संगिता नष्टे, प्रियांका गायकवाड, सागर गायकवाड, विष्णू रंदवे, भैय्या गोसावी, दत्तात्रय पोटे, नागनाथ केकान, बंडू शिंदे, प्रकाश ननवरे, मयुर देवी, सय्याजी जाधव, ईश्वर मोरे, दिगंबर राखुंडे, सचिन कानगुडे, गणेश वाळुंजकर, संतोष जमदाडे, गणेश वाशिंबेकर व करमाळा तालुक्यातील आणि शहरातील तमाम जनता व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *