करमाळा प्रतिनिधी

शेटफळ परिसरातील वीज समस्या कायमस्वरूपी सुटणार, पाच एम व्हीचा ऍडिशनल ट्रान्सफार्मर बसवणार अशी माहिती आमदार नारायण आबा पाटील यांनी दिली. याबाबत अधिक सविस्तर बोलताना आमदार पाटील यांनी सांगितले की उजनीकाठच्या गावातील पाण्याखाली येणारे वाढते क्षेत्र पाहता या भागात वीजेच्या मागणी इतपत वीज पुरवठा झाला पाहिजे यासाठी आपले विशेष प्रयत्न राहिले. यातुनच शेटफळ येथील ३३/११ के व्ही उपवीज केंद्रात आता पाच एम व्ही क्षमतेचा एक अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवला जाणार आहे् यामुळे शेटफळ आणि परिसरात वारंवार स्ट्रीप होणारी लाईट समस्या आता सुटली जाईल. तसेच या भागात पुर्ण दाबाने वीज मिळणार आहे. या भागातील केळी लागवड क्षेत्र पाहता केवळ वीजे अभावी या नगदी पिकावर‌ परिणाम होत होता् भविष्यात ही समस्या जादा प्रमाणात जाणवणार नाही. या भागात सर्रास प्रमाणात ऊस व‌केळी ही पिके घेतली जातात. यामुळे आता उजनीकाठच्या सर्वच गावातील शेती पंपास मागणी इतका वीज पुरवठा व्हावा तसेच पुर्ण दाडाने अखंडीत वीज पुरवठा होण्यासाठी या पाच वर्षात विशेष नियोजन व पाठपुरावा करुन आपण यासाठी लक्ष देणार असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. तर येत्या १७ मे रोजी शनिवारी सकाळी आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत या अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर कामाचे भुमिपुजन होणार असुन त्यानंतर एक ते दिड महिन्यात हे काम पुर्ण होईल‌ अशी माहिती आमदार पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी दिली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *