करमाळा प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा च्या वतीने संजय (बापु) घोलप मनसे तालुकाध्यक्ष यांनी करमाळा तालुक्याची आमसभा आमदार नारायण (आबा) पाटील यांनी घ्यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार दि. 30/5/2025 वार शुक्रवार रोजी नालबंद मंगल कार्यालय येथे घेण्याचे आदेश गटविकास अधिकारी करमाळा यांनी दिले आहेत.

महत्वाची सुचना अशी की, करमाळा तालुक्यातील आमसभा हि 15 वर्षी नंतरच करमाळा तालुक्यात होत असुन त्याचा लाभ तालुक्यातील व शहरातील नागरीकांनी आपले प्रश्न दि. 17/5/2025 वार शनिवार तारखेपर्यंत पंचायत समिती करमाळा येथे अर्ज भरून देण्यात यावे किंवा पंचायत समिती ईमेल वरती अर्ज लिहुन पाठवावे ईमेल Karmalaaamsabha@gmail.com  त्याची पोच आपल्या जवळ ठेवुन दि. 30/5/2025 वार शुक्रवार रोजी नालबंद मंगल कार्यालय अहिल्यादेवी नगर रोड येथे उपस्थित राहुन आपले प्रश्नाचे उत्तर संबंधित अधिकारी यांच्या कडुन आपल्याला देण्यात येईल याची नोंद घ्यावी. आमसभा संदर्भात काही अडचण असल्यास संजय (बापु) घोलप मनसे तालुकाध्यक्ष यांच्याशी संपर्क साधावा मो. 9011148077

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *