कोंढार चिचोली डिकसळ पुलाचे काम युध्दपातळीवर पाण्यात लॉचिंग करून कुगाव शिरसोडी पुलाच्या धरतीवर करण्याची शासनाकडे मागणी==देवीदास साळुंके मा सरपंच कोंढार चिंचोली.
कोंढार चिंचोली डीकसळ पुलाचे काम चालू करून साधारण 20 दिवसाचा कालावधी होऊनई कामाची प्रगती समाधानकारक नाही,कामासाठी जास्त मनुषबळाची गरज आहे,कामा करिता जास्त मशनरी पाहिजे,करिता काम वेगात करने कामी व पाण्यात लॉन्चिंग करून युध्दपातळीवर कुगाव शिरसोडी पुलाच्या धरतीवर करण्याची मागणी शासन दरबारी लेखी स्वरुपात आर टी आय कार्यकर्ता,तथा कोंढार चिंचोली मा सरपंच देवीदास साळुंके यानी केली असुन त्या निवेदनाच्या प्रती उप मुख्यमंत्री तथा,बांधकाम मंत्री एकनाथराव शिंदे,बांधकाम सचिव,पालक मंत्री,खासदार ,आमदार नारायण आबा पाटील,चिफ इंजिनियर,अधिक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता,उप अभियंता करमाळा,जिल्हाधिकारी,सोलापुर,तहसीलदार करमाळा यांचेकडे करून सदर पुलाच्या कामाची मुदत ही 36 महिन्याची असुन पैकी 20 महिने होऊन गेले आहेत 16 महिने कामास उर्वरित बाकी आहे त्यामुळे पुलाचे काम युध्दपातळीवर जास्त यंत्रना वापरुन व मनुष बळ वाढवणे गरजेचे असलेचे देवीदास साळुंके यानी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे सध्या नदीचे पाणी पातळी अतिशय काम करण्यास पोषक आहे कामाचा वेग वाढून काम युध्दपातळीवर व्हावे अशी मागणी शासन दरबारी साळुंके यानी केली आहे
